पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना पोलीस उपअधीक्षकपदी बढती

गडचिरोली येथे जिल्हा प्रमाणपत्र तपासणी समितीमध्ये नियुक्ती


स्थैर्य, फलटण, दि. ०८ ऑगस्ट : फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील दशरथ महाडिक यांना पोलीस उपअधीक्षकपदी बढती मिळाली आहे. त्यांची नियुक्ती गडचिरोली येथील जिल्हा अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीमध्ये करण्यात आली आहे.

राज्याच्या गृह विभागाने गुरुवार, दि. ७ ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षकांना उपअधीक्षकपदी पदोन्नती देण्याच्या नियुक्त्यांचे आदेश जाहीर केले. यामध्ये सुनील महाडिक यांच्या नावाचा समावेश आहे.

पोलीस निरीक्षक महाडिक यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आपल्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले होते. त्यांच्या बढतीबद्दल आणि नवीन नियुक्तीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!