ऐकीव धबधब्यात दोघांना ढकलणार्‍या पाच संशयितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात


दैनिक स्थैर्य | दि. २१ जुलै २०२३ | सातारा |
ऐकीव धबधब्यात दोघांना ढकलून देणार्‍या पाच संशयित युवकांना मेढा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

असिफ शेख, पप्पू कुंदन पवार, निखिल कोळेकर, साहील शेख आणि सोनू खवळे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. या घटनेतील अजून पाच संशयित फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या घटनेची माहिती अशी, काही दिवसांपूर्वी जावली तालुक्यातील ऐकीव धबधब्यावर झालेल्या भांडणातून दोघाजणांना काही युवकांनी कड्यावरून ढकलून देऊन त्यांचा खून केला होता. या घटनेनंतर मेढा पोलीस ढकलून देणार्‍या आरोपींच्या शोधात होते. त्यासाठी मेढा पोलिसांनी वेगवेगळी तपास पथके बनवून ती ठिकठिकाणी पाठविली होती.

मेढा पोलिसांनी आरोपींचा शोध घेत असताना काही तांत्रिक माहितीच्या आधारे वरील पाच संशयितांना परजिल्ह्यातून तसेच सातार्‍यातून ताब्यात घेतलं आहे. या घटनेतील अजून पाचजण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत.


Back to top button
Don`t copy text!