दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२१ । फलटण । महाराष्ट्र पोलीस खात्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी व अतिशय कर्तव्यदक्ष राहून प्रामाणिकपणे आपल्या जीवाची कुठलीही पर्वा न करता कर्तव्य बजावत असतात. यासाठी त्यांना 24 तास जनतेसाठी सज्ज रहावे लागते. आपल्या कुटूंबाला सण – उत्सवावेळी ते वेळ देवू शकत नाहीत. कामातील या अतिताणामुळे पोलीस वर्गाचे मानसिक आरोग्य बिघडत असते. यासाठी पोलीसांची ड्युटी आठ तासांची करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गजानन भगत यांनी केली आहे. पोलीसांची ड्युटी आठ तासांची झाल्यास ते आपल्या कुटूंबाला वेळ देतील आणि त्यांचे कुटुंबीय आनंदी राहील, असेही गजानन भगत यांनी स्पष्ट केले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना पोलीसांच्या प्रश्नांविषयी संविधानीक निवेदन देणार असल्याचेही गजानन भगत यांनी सांगितले.