कोरेगाव शहरात विनाकारण बाहेर फिरणार्‍यांवर पोलिसांची धडक कारवाई; २० हजारांचा दंड वसूल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कोरेगाव, दि.२२: कोरेगाव शहर आणि तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी धडक कारवाईस सुरुवात केली आहे. मंगळवारी सकाळी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १०१ वाहनांवर कारवाई करत २० हजारांहून अधिक दंड वसूल केला आहे. शासनाच्या निर्बंधांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने खळबळ उडाली आहे.

कोरोना रोखण्यासाठी शासनाने अत्यंत कडक नियम केले आहेत, विविध विषयांवर निर्बंध घातले असून, पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सहाय्यक उपनिरीक्षक विजय जाधव, केशव फरांदे, हवालदार मिलिंद कुंभार, धनंजय दळवी, अमोल सपकाळ, किशोर भोसले, वाहतूक नियंत्रण शाखेचे समाधान गाढवे, महेश जाधव, जस्मीन पटेल, प्रशांत लोहार यांच्यासह गृहरक्षक दलाच्या जवानांनी सातारा जकात नाका, आझाद चौक, स्व. आमदार दत्ताजीराव बर्गे चौक, कुमठे फाटा परिसरात विनाकारण घराबाहेर फिरणार्‍या १०१ दुचाकीस्वारांवर कारवाई करत २० हजारांहून अधिक दंड वसूल केला आहे.
दुचाकी क्वारांटाईन करणार

राज्य शासन कोरोना रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना काही जण विनाकारण नियम मोडण्यामध्ये आनंद मानत आहेत, हे रोखण्यासाठी कोरेगाव शहरासह पुसेगाव, रहिमतपूर व वाठार स्टेशन पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनाकारण बाहेर पडणार्‍यांच्या दुचाकी जप्त करुन त्या पोलीस ठाण्याच्या आवारात क्वारांटाईन केल्या जाणार आहेत, असा इशारा उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी दिला.


Back to top button
Don`t copy text!