पोलिसांनी पूर्ण केली शोध मोहीम, फोन करुन धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,नवी दिल्ली, दि. ४: ताज महलात बॉम्ब असल्याचे वृत्त खोटे निघाले आहे. पोलिसांनी सर्च ऑपरेशननंतर ही माहिती दिली. ताज परिसर पर्यटकांसाठी पुन्हा उघडण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, फोन करुन बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्याची ओळख पटली आहे. त्याने फिरोजाबाद येथून फोन केला होता.

यापूर्वी ताज महलात बॉम्ब असल्याच्या वृत्तानंतर पर्यटकांना बाहेर काढण्यात आले होते. ताज महलचे दोन्हीही दरवाजे बंद करण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले की, ‘बॉम्ब ठेवल्याची सूचना एका अज्ञात व्यक्तीने 112 नंबरवर दिली होती. त्याने म्हटले की, सैनिक भर्तीमध्ये घोळ होत आहे. यामुळे त्याची भर्ती होऊ शकली नाही. त्याने ताज महलमध्ये बॉम्ब ठेवला आहे. तो थोड्याच वेळात फुटेल.’

सकाळी 9.30 वाजता पर्यटकांना ताज महल परिसरातून बाहेर काढण्यात आले होते.
सकाळी 9.30 वाजता पर्यटकांना ताज महल परिसरातून बाहेर काढण्यात आले होते.


Back to top button
Don`t copy text!