महामार्गावर लूटमार करणारा पोलिसांच्या ताब्यात


 


स्थैर्य, सातारा, दि.१०: लिंब गावाच्या हद्दीत चारचाकी वाहन चालकाची लूट मार करणाऱ्या दोन चोरटयांना स्थानिक गुन्हे शाखा व सातारा तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई करून ताब्यात घेतले .

सचिन दिलीप जमदाडे व वैभव संजय पवार रा लिंब अशी चोरटयांची नावे आहेत . दि 8 रोजी महामार्गावर गौरीशंकर कॉलेज जवळ सुरू असणाऱ्या कोविड सेंटरसाठी औषध पुरवठा करणाऱ्या वाहनचालकाला मोटार सायकल आडवी मारून संबधितांनी त्याच्याकडील दहा हजार रूपये किंमतीचा मोबाइल चोरून नेला . या संदर्भात आनेवाडी येथील विश्वजीत फरांदे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती . पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, यांच्या मार्गदर्शनातंर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील व सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या पथकाने सातारा शहरातील भूविकास बॅंक येथे शोधमोहिम राबवली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन एकाकडे कौशल्यपूर्ण पध्दतीने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले . संशयितांकडून मोबाइल व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे . पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, सुधीर बनकर, आतिश कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला प्रवीण फडतरे मुनीर मुल्ला, प्रमोद सा


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!