
दैनिक स्थैर्य । दि. १३ नोव्हेंबर २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू झाला आहे त्यामुळे उसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर न लावणे ध्वनी प्रदूषण तसेच अन्य तांत्रिक कारणास्तव सातारा जिल्ह्यातील 205 वाहनांवर सातारा पोलिसांनी कारवाई करून एक लाख नव्वद हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल केला आहे याची माहिती पोलीस विभागाने पत्रकार द्वारे दिली आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या हलगर्जीपणामुळे अपघात होत असतात . ऊस वाहतूक करणारे वाहनांवर रिफ्लेक्टर न लावल्यास कारवाई करणे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील कर्कश्य साऊंड ध्वनी प्रदूषण कायद्याअंतर्गत काढून टाकणे याकरता विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या . त्यानुसार सातारा जिल्ह्यामध्ये ही मोहीम सुरू झाली आहे त्याप्रमाणे शनिवारी सातारा जिल्ह्यात या विशेष मोहिमेमध्ये 205 वाहनांवर कारवाई करून एक लाख 90 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला या वाहनांवर रिफ्लेक्टर नसल्याचे आढळून आले.
ध्वनी प्रदूषण करणाऱ्या एकूण 18 वाहनांवर कारवाई करून बारा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला तसेच एकूण 78 वाहनांवरील साऊंड काढण्याची कारवाई करण्यात आली तसेच इतर कायद्यान्वये एकूण 108 वाहनांवर कारवाई करून एकूण 75 हजार 500 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे यापुढे देखील सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे उस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टर लावणे रिफ्लेक्ट न लावण्यास कारवाई करणे ही विशेष मोहीम सुरूच राहणार असल्याचे पोलीस दलाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.