कवयित्री विनया सावंत यांचा कवी कट्ट्याद्वारे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ फेब्रुवारी २०२३ । सातारा । नुकतेच वर्धा येथे विदर्भ साहित्य संघ-शताब्दी वर्षानिमित्त आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे ९६ वे अखिल भारतीय साहित्यसंमेलन पार पडले. संमेलनात कवी कट्टा व गझल कट्ट्याचे विशेष आयोजन करण्यात आले होत. यावेळी मुंबई येथील कवयित्री विनया प्रदिप सावंत यांना त्यांच्या स्वरचित ‘क्षण नकळत विरघळले’ या कवितेच्या सादरीकरणासाठी कवी कट्ट्याद्वारे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या सन्मान सोहळ्याला गझलकार मंजुळ चौधरी, गझलकार कविता झुंझारराव, पत्रकार विशाल मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती होती.

कवी कट्टा सातत्याने यशस्वी करणारे ज्येष्ठ कवी-गीतकार राजन लाखे, कवी कट्टा उपसमन्वयक प्रसाद देशपांडे, सुप्रिसद्ध गझलकार प्रशांत वैद्य तसेच इतर समन्वयक यांचा ऋजुता तायडे (दिग्रस) निर्मित “मराठी भाषा चिन्ह” देऊन साहित्यसंपदा तर्फे गौरव करण्यात आला.

गेले अनेक वर्ष कवी कट्टाच्या माध्यमातून नवोदितांना हक्काचे व्यासपीठ मिळत आहे. कवी कट्ट्यावर महाराष्ट्रातील विविध भागांतील कवींनी सहभाग घेतला होता. त्यात विनया सावंत (मुंबई), हनुमंत देशमुख (पुणे), श्वेता लांडे (कोल्हापूर), सरावा कादंबरीकार, किसन वराडे (कल्याण), कल्पना मापुस्कर (मुंबई), अनघा सोनखासकर (अकोट) तसेच इतर कवींनी आपल्या कविता सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली.


Back to top button
Don`t copy text!