स्थैर्य, फलटण दि.15 : महापुरुषांचा जीवनपट आपल्या विशिष्ट शैलीत लिहून, कविता, लेख व चारोळ्यांच्या माध्यमातून, विविध विषयांवर लिखाण करून अल्पावधीतच सुपरिचित झालेले भुईंज (ता.वाई, जि. सातारा) येथील प्रसिद्ध कवी व लेखक श्रीगणेश शेंडे यांची नुकतीच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वाई तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष सचिन गोसावी, सातारा जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम, खटाव तालुका अध्यक्ष किरण अहिवळे, फलटण तालुका उपाध्यक्ष आकाश आढाव, लेखक शरद पोतदार, कवयित्री छाया जावळे,संदिप जावळे,क्रिडा लेखक शिवाजी निकम,कवयित्री राजश्री पोतदार,छायाचित्रकार उद्धव निकम,कवी अनिल जाधव तसेच शिवाजी शिंदे,संतोष शिंदे, अनिल पिसाळ, महादेव क्षीरसागर, विनोद सुतार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन वाई तालुका अध्यक्षपदी निवड केल्याची घोषणा केली.
वाई येथे पार पडलेल्या सदर कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या सातारा जिल्हा ’ज्येष्ठ मार्गदर्शक पदी’ केंद्रप्रमुख विट्ठल माने यांची तर सातारा जिल्हा ’संघटकपदी’ सौ.योगिता राजकर यांची निवड करण्यात आली. मधुरा गार्डन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात वाई तालुका कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. वाई तालुका उपाध्यक्षपदी सौ.मनिषा शिंदे, वाई तालुका सरचिटणीसपदी सुशांत मोतलिंग, वाई तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी पत्रकार पांडुरंग भिलारे, वाई तालुका ज्येष्ठ मार्गदर्शकपदी रविंद्रकुमार लटिंगे यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.
या निवडीनंतर श्रीगणेश शेंडे व संपुर्ण वाई तालुका कार्यकारणी यांनी गावागावांत जाऊन विद्यार्थी व युवकांमध्ये साहित्याविषयी उर्जितावस्था निर्माण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणार असल्याचे सांगितले.
सदर निवडीबद्दल विठ्ठल माने, योगिता राजकर, श्रीगणेश शेंडे व वाई तालुका कार्यकारणीचे साहित्य, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर व मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुशांत मोतलिंग यांनी केले. तर आभार कवी रविंद्रकुमार लटिंगे यांनी मानले.