दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑगस्ट २०२२ । सातारा । अमृतवाडी येथील ‘वृद्धामृत ‘कवितासंग्रह लिहिणारे कवी शाशिकांत पार्टे वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर देखील अनेक विधायक कार्यात मग्न आहेत. स्वतःच्या पेन्शन मधून सत्पात्री दान करावे आणि त्यातून चांगले काम व्हावे यासाठी त्यांनी वृक्षारोपण ,अनाथासाठी काम करणाऱ्या निवारा केंद्रास देणगी,अनेक शाळा महाविद्यालयात कवितांचे सादरीकरण करून नैतिक व व्यावहारिक प्रबोधन असे कार्य करीत आहेत.त्यांनी नुकतेच यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाचवड येथील महाविद्यालयात जाऊन पारितोषिक वितरण दिनी ठेव म्हणून दहाहजार रुपये कॉलेजला दिले आहेत.आणि दरवर्षी मिळणाऱ्या व्याजातून महाविद्यालयात पदवी परीक्षेस प्रथम येणाऱ्या विद्यार्थी अगर विद्यार्थिनीस पारितोषिक दिले जावे अशी विनंती त्यांनी केली आहे. त्यांनि उस्फुर्त रित्या पारितोषिक दिल्याबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.प्रतिभा गायकवाड यांनी त्यांचा यथोचित सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रमुख अतिथी मा.सौ.गंधाली दिंडे या व महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.