स्थैर्य, सातारा : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शासनाने जाहिर केलेल्या लॉकडाउनच्या कालावधीत सकारात्मक व आधारभूत लिखाण केल्याबद्दल सातारा शहरातील कवियत्री व लेखीका रश्मी हेडे यांना नवी दिल्लीसह मुंबई येथील संस्थांच्यावतीने ‘कोविड योध्दा’ म्हणून गौरविण्यात आले आहे.
कोरोना महामारीमुळे देशात जाहिर केलेल्या लॉकडाऊन कालावधीत हेडे यांनी आहे. आपल्या लेखणीद्वारे समाज माध्यमातून, विविध वृत्तपत्रातून सातत्याने कविता, लेख,आत्म कथन या माध्यमातून सकारात्मक व धिरात्मक लिखाण केले. त्यामुळे त्यांना सत्यवादी ह्यूमन राईट्स, मुंबई आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्सेस, नवी दिल्ली, भारतीय महाक्रांती सेना, मुंबई या संस्थाच्यावतीने कोविड योध्दा म्हणून गौरविण्यात आले आहे.
लेखनाबरोबरच रश्मी हेडे यांनी ‘आरसा’ या कॅन्सर ग्रस्तांना उभारी देणाऱ्या लेखक – दिग्दर्शक आशिष निनगुरकर यांच्या लघुपट निर्मितीसाठी सहाय्यही केले आहे. त्याचबरोबर कल्पना एकाची व साथ अनेकांची या महिलांच्या व्हाट्सॲप ग्रुपद्वारे अनेक उपक्रम राबविले आहेत. तसेच पुरुषमंडळींनाही बायकोबद्दल भावणा व्यक्त करण्यास व्यासपिठ उपलब्ध करुन दिले त्यामध्ये चाळीस पेक्षा जास्त पुरुषांनी सहभागी होऊन आपल्या शब्दरुपी भावणा व्यक्त केल्या. ‘आनंद द्या आनंद घ्या’ या संकल्पनेतून रश्मी हेडे या आजही कार्यरत आहेत. त्यांनी केलेल्या कार्याची दखल त्यांचा कोविड योध्दा म्हणून गौरविण्यात आले.