फलटणमध्ये पोदार प्रेप स्कुलची सुरुवात : एका नवीन शैक्षणिक युगाची सुरुवात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । फलटण । फलटण शहरामध्ये पोदार प्रेप स्कुलची स्थापना झाली आहे, ज्यामुळे या शहरातील शिक्षण व्यवस्थेत एक महत्त्वपूर्ण बदल घडून आला आहे. ही संस्था पोदार एज्युकेशन स्कुल ग्रुपच्या अंतर्गत येते आणि त्याच्या माध्यमातून फलटणच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण अर्थात ऑस्ट्रेलिया व लंडन येथे ज्या पद्धतीने शिक्षण मिळते त्याच पद्धतीने या ठिकाणी शिक्षण मिळणार आहे. या स्कुलमध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर केजी, आणि सिनिअर केजी या चार वर्गांची सुरुवात करण्यात आली आहे.

श्री सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे शिल्पकार दिलीपसिंह भोसले यांच्या पुढाकाराने फलटण येथील सर्वसामान्य विद्यार्थांना सुद्धा पुणे, मुंबईच्या धर्तीवर चांगले शिक्षण घेता यावे यासाठी किंग्स पोदार इंटरनॅशनल स्कुल, फलटणची स्थापन केली आहे. फलटण येथील या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून दिलीपसिंह भोसले हे स्वतः कामकाज बघणार आहेत तर सचिव म्हणून रणजितसिंह दिलीपसिंह भोसले हे कामकाज बघणार आहे. दिलीपसिंह भोसले यांच्या नियोजनात किंग्स पोदार इंटरनॅशनल स्कुल सुरु होत असल्याने उत्तम शिक्षण व्यवस्था कायमच राहील; असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

पोदार प्रेप स्कुल हे फलटण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रायगड हॉटेलच्या जवळ, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या “अरविंद” निवासस्थानी सुरू करण्यात आले आहे. हे स्थान शैक्षणिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे कारण येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या समृद्ध वारसाचा लाभ मिळणार आहे. तरी अधिक माहितीसाठी +919090423030 या नंबर द्वारे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोदार एज्युकेशन स्कुल ग्रुप हा भारतातील एक प्रमुख शैक्षणिक संस्था आहे, ज्याला देशभरातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांपैकी एक मानले जाते. या ग्रुपमध्ये १४९ पोदार इंटरनॅशनल स्कुल, १२२ पोदार पार्टनर स्कुल, आणि ४०० पोदार प्री स्कुल आहेत. यामध्ये सुमारे २ लाख ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. पोदार प्रेपला भारतातील सर्वोत्कृष्ट स्कुल म्हणून मान्यता मिळाली आहे.

याबाबत सर्वात महत्वाची बाब म्हणजे पोदार स्कूल ग्रुपची स्थापना झाल्यानंतर पहिले अध्यक्ष म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी कामकाज पाहिले आहे; म्हणजे पोदार स्कूल ग्रुप हे अत्यंत जुने व विश्वसनीय स्कूल ग्रुप आहे. पोदार ग्रुपमध्ये शिकवणारे सर्व शिक्षक वर्ग हा उच्च शिक्षित असून नीतिमूल्ये जपणारा आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी प्रथम अध्यक्ष म्हणून भूमिका बजावली असल्याने त्याला शैक्षणिक वारसा सुद्धा मोठा आहे.

यासोबतच वडजल येथे अर्थात वडजल – भिलकटी रोड येथे किंग्स पोदार इंटरनॅशनल स्कुलचे भव्य – दिव्य शैक्षणिक संकुल उभे राहत आहे. यामध्ये पहिलीपासून ते दहावीपर्यंतचे शिक्षण विद्यार्थांना फलटण येथेच मिळणार आहे. आता फलटणच्या विद्यार्थांना पुणे, मुंबई किंवा बारामती येथे जाऊन शिक्षण घेण्याची आवश्यकता अजिबात भासणार नाही. येत्या काही दिवसात वडजल येथील शैक्षणिक संकुल पूर्णत्वास जात आहे. त्यानंतर लगेचच तिथे सुद्धा ऍडमिशन सुरु होणार आहे.

“पोदार प्रेप स्कुलची स्थापना ही फलटणच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हे स्कुल विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट शिक्षण देऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे,” असे मत संस्थेचे सचिव रणजितसिंह दिलीपसिंह भोसले यांनी व्यक्त केले.

230320255

Back to top button
Don`t copy text!