दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२३ । फलटण ।
येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या पॉकेट कॅफे हे रेस्टॉरंट नक्कीच फलटणकरांच्या पसंतीस उतरेल; असा विश्वास विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
पॉकेट कॅफे या रेस्टॉरंटला आज श्रीमंत रामराजे यांनी भेट दिली; त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, माजी उपनगराध्यक्ष नितीन भोसले, पॉकेट कॅफेचे गजानन चाफळकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
फलटण सारख्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरात पुण्यातील नामांकित पॉकेट कॅफेची नवीन शाखा फलटणकरांच्या सेवेत रुजू झाली आहे. पॉकेट कॅफेचे वैशिष्टय म्हणजे इटालियन फास्ट फूड, युरोपीयन कॉफी कल्चरसाठी चोखंदळ खवैयांची रसना तृप्त करण्यासाठी इथे असणारी स्वछता, आणि लहान थोरात प्रिय असणारे कोल्ड कॉफीचे विविध प्रकार, पिझ्झा, पास्ता, नुडल्स, सँडविच, मोकटेल, कॅपॅचीनो, ब्राऊनीज, मिल्क शेकचे विविध प्रकार अतिशय स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरणात बनवले जातात. पॉकेट कॅफे हे नावाप्रमाणेच पॉकेटला ही खूप भार न देणारे आहे; तरुणाईला साद घालत, लहान थोरांना सोबत घेत लवकरच नावारूपास येईल.