
स्थैर्य, सातारा, दि.३: येथील कमानी हौदापाठीमागील रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला.
याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी, सौ. विमल बाळासाहेब जाधव वय 60 या शुक्रवारी सायंकाळी 7 च्या सुमारास मुलीसह वॉकिंगसाठी गेल्या होत्या. वॉकिंग करून दोघी घराकडे कमानी हौदापाठीमागील रस्त्याने जात होत होत्या. यावेळी पटवर्धन हॉस्पिटलसमोर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सौ. जाधव यांच्या गळ्यातील 7 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र ओढून हिसकावले व पोबारा केला. याप्रकरणी सौ. जाधव यांनी शहर पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार दोघा अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करत आहेत.