पंतप्रधान 28 डिसेंबर रोजी दिल्‍ली मेट्रोच्‍या मॅजेंटा लाईनवरुन भारताच्‍या पहिल्‍या चालकविरहित ट्रेनचे उद्घाटन करणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२७: पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता विमानतळ एक्‍स्‍प्रेस मार्गावरील पूर्णपणे कार्यरत नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सेवेसह दिल्ली मेट्रोच्या मॅजेंटा लाइन (जनकपुरी वेस्ट-बोटॅनिकल गार्डन) वरील भारतातील पहिल्याच चालकविरहित ट्रेनचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे उद्घाटन करणार आहेत.

या नवीन उपक्रमांमुळे प्रवासात आराम आणि गतीशीलतेच्या नवीन पर्वाची नांदी होईल. चालकविरहित ट्रेन्‍स पूर्णपणे स्वयंचलित केल्या जातील, ज्यामुळे मानवी चुकांची शक्यता कमी होईल. मॅजेंटा लाइनवर चालकविरहित सेवा सुरू झाल्यानंतर  2021 च्या मध्यापर्यंत दिल्ली मेट्रोच्या पिंक लाईनमध्ये चालकविरहित मेट्रो गाड्या  सुरू होतील.

या सोबतच एअरपोर्ट एक्स्प्रेस लाइनवर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड पूर्णपणे कार्यान्वित केले जाणार आहे.  देशातील कोणत्याही भागातून जारी केलेले रुपे-डेबिट कार्ड असलेल्या व्‍यक्तिला ते कार्ड वापरुन विमानतळ एक्सप्रेस मार्गावर प्रवास करता येईल. ही सुविधा 2022 पर्यंत संपूर्ण दिल्ली मेट्रो नेटवर्कवर उपलब्ध होईल.


Back to top button
Don`t copy text!