
स्थैर्य, 11 मार्च, सातारा : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा माहे डिसेबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीतील २२ वा हप्ता देशातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दि. १३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता ज्योती बिश्नु आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र, खानापारा, गुवाहाटी, आसाम येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत वितरीत होणार आहे. या अनुषंगाने दि. १३ मार्च २०२६ हा दिवस “PM KISAN उत्सव दिवस म्हणून साजरा करून जिल्हयामध्ये तालुका व ग्रामपंचायत स्तरावर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून सर्व शेतकऱ्यांनी दि. १३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालाकडून करण्यात आले आहे.
