
दैनिक स्थैर्य । 21 मार्च 2025। फलटण । तालुक्यातील सस्तेवाडी येथे होणाऱ्या प्लॉटिंग हे बेकायदीशीर नसून संपूर्ण शासनाच्या नियमात आहे. यामध्ये काही संघटना मुद्दामून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मत फलटण पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय सोडमिसे यांनी व्यक्त केले.
याबाबत अधिक माहिती देताना सोडमिसे म्हणाले कि, फलटणच्या प्रशासनाला काही संघटनांच्यावतीने मुद्दामून विविध निवेदने देत सस्तेवाडी येथे असणाऱ्या गट क्रमांक 48/3/1 व 48/3/2 मधील बेकायदेशीर प्लॉटिंग करत असल्याचा आरोप करीत आहेत. परंतु हि प्रशासनाची व जनतेची दिशाभूल करीत आहेत. शासनाच्या नियमात राहूनच आम्ही सस्तेवाडी येथे प्लॉटिंग केले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी मूळ जमिन मालक विशाल देशमुख यांनी माहिती देताना स्पष्ट केले कि, साधारण गत १५ वर्षांच्याहून अधिक काळ आमचा सस्तेवाडी येथे वास्तव्य आहे. आम्ही कोणतेही अनियमित कामकाज केले नाही. कुणाचाही पोटपाट मोडला नाही. काही समाजकंठक मुद्दामून जनतेची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत.