कृपा करून प्रशासनाला सहकार्य करा : श्रीमंत रघुनाथराजे; प्रांताधिकारी, सुविधा हॉस्पिटल आणि रेमडिसिव्हर प्रकरणावर श्रीमंत रघुनाथराजेंची फेसबुक कमेंट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. १३ : सध्या फलटण तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. असे असताना फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक भारत केंद्रे व नितीन सावंत, फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड व या सर्व विभागांचा अधिकारी व कर्मचारी वर्ग हे आउट ऑफ द वे जावून काम करीत आहेत. त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहणे हे महत्त्वाचे आहे. या अवघड काळामध्ये त्यांना त्रास देणे हे योग्य नाही. लोकांना त्रासदायक होईल असे काहीही न करता कृपा करून प्रशासनाला सहकार्य करावे ही विनंती, अश्या आशयाची फेसबूक कमेंट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी “प्रांताधिकाऱ्यांकडून रेमडिसिव्हर भरकटवण्याचा प्रयत्न” या फेसबुक पोस्टवर दिलेली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, गेल्या दोन दिवसांपूर्वी प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी सुविधा हॉस्पिटलच्या प्रशासनाने केलेल्या आवाहनाचा व्हिडिओ WhatsApp ग्रुप वर शेअर केला. त्या नंतर फलटण मधील पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांना चांगलेच ट्रोल करण्यात आले. प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप हे नुकतेच घडलेल्या रेमडिसिव्हर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत व पत्रकारांचा आवाज दाबण्यासाठीच तो व्हिडीओ शेअर केला, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले. या सर्व प्रकरणावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी संबंधित बातमीच्या फेसबुक पोस्ट वर कमेंटद्वारे प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!