
दैनिक स्थैर्य । दि. २८ फेब्रुवारी २०२२ । सातारा । राज्यातील विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये 19 वर्षाच्या आतील खेळाडूंना सरळ सेवा प्रवेश व खेळ निहाय कौशल्य चाचण्यांद्वारे निवासी तसेच अनिवासी प्रवेश देण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील फुटबॉल या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तर प्रविण्य व सहभाग घेतलेल्या 19 वर्षाच्या आतील खेळाडूंनी आपले विहित नमून्यातील अर्ज दि. 7 मार्च 2022 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरिता राज्यात प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन शास्त्रोक्त प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास, अद्यावत क्रीडा सुविधा, क्रीडा प्रबोधिनीच्या अंतर्गत देण्यात येणार आहे.
अधिक महितीसाठी क्रीडा मार्गदर्शक अनिल सातव-9623945371, महेश खुटाळे-9422603411 व दत्तात्रय माने 8888851622 यांच्याशी संपर्क साधावा.