दैनिक स्थैर्य | दि. 23 डिसेंबर 2024 | फलटण | येथील मुधोजी महाविद्यालयाच्या खेळाडूंची कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या विविध संघामध्ये निवड झाली असून निवडीबद्दल आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कु.पूजा फडतरेची शिवाजी विद्यापीठ खो-खो संघ, कु. वैष्णवी फडतरेची शिवाजी विद्यापीठ हॉलीबॉल संघ, कु.श्रद्धा शिंदेची शिवाजी विद्यापीठ हॉलीबॉल संघ, कु. तीर्थ धुमाळची शिवाजी विद्यापीठ हॉकी संघ, कु.अनुराधा ठोंबरेची शिवाजी विद्यापीठ हॉकी संघ, कु. ऋतुजा तांबेची शिवाजी विद्यापीठ बॉक्सिंग संघ, कु.गीतांजली बंडगरची शिवाजी विद्यापीठ बॉक्सिंग संघ, कु.रुचिता कदमची शिवाजी विद्यापीठ जलतरण संघ, कु.अजित श्रीरामची शिवाजी विद्यापीठ तिरंदाजी संघामध्ये निवड झाली आहे.
सदरील निवडीबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी सर्व संघाचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.