मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीटासाठी 10 ऐवजी द्यावे लागणार 50 रुपये

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य ,मुंबई, दि.२: सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात रेल्वे विभागाने रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील निवडक रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीटासाठी आता 10 रुपयांऐवजी 50 रुपये द्यावे लागणार आहेत. सेंट्रल रेल्वेने प्लॅटफॉर्ट तिकीटांमध्ये पाचपट वाढ केली आहे. प्लॅटफॉर्म तिकीटांच्या किमती वाढवण्यात आलेल्या स्टेशनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CST),दादर आणि लोकमान्य तिलळ टर्मिनस सामील आहेत.

याबाबत रेल्वे विभागाने सांगितले की, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. लवकरच येणाऱ्या समर सीजनसाठीही आमच्याकडे प्लॅन तयार आहे.

बाहेरील स्टेशनवरही महाग मिळणार प्लॅटफॉर्म तिकीट

मुंबईच्या बाहेरील स्टेशन, जसे ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी रोड स्टेशनवरही प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये केले आहे. सेंट्रल रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) शिवाजी सुतार म्हणाले की, प्लॅटफॉर्म तिकीटांचे नवीन दर 24 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. हे नवीन रेट 15 जूनपर्यंत राहणार आहेत. मुंबईमध्ये फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना संक्रमितांच्या संख्येत वाढ झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!