जनजागृती उपक्रम हाती घेवून वृक्ष लागवड व संवर्धन करणे काळाची गरज : सौ.वैशाली चोरमले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : भारताची वाढती लोकसंख्या व लोकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी  वाढलेले औद्योगीकरण, सिमेंटची जंगले यासाठी मोठ्या प्रमाणावर झालेली वृक्षतोड व वृक्षतोडीमुळे ढासळलेले पर्यावरण यासाठी  सर्व शालेय व सामाजिक स्तरावर विद्यार्थी व सामाजिक संस्थांकडून जनजागृती करणारे उपक्रम हाती  घेवून वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन फलटण नगर परिषद महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. वैशाली चोरमले यांनी केले.

येथील महात्मा शिक्षण संस्था संचलित, मूकबधिर विद्यालय परिसरामध्ये वृक्ष लागवड सप्ताह निमित्त  वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले, संस्थेच्या संचालिका सौ. नंदा चोरमले, बाळासाहेब चोरमले,ओंकार चोरमले, नितेश शिंदे, सौ. शशिकला विटकर, चैतन्य खरात, अविनाश चोरमले उपस्थित होते.

मानवाला त्यांच्या दैनंदिन जीवनात लागणार्‍या सर्व गोष्टी अगदी निरपेक्ष हेतूने वृक्ष देतात. मानवाची अन्नधान्याची गरज भागविण्यापासून, घर सजावटीसाठी लागणार्‍या वस्तू ही वृक्षाची देण असून आयुर्वेदातील औषधांचा पुरवठा, सौंदर्य प्रसाधनांची उपलब्धता वृक्षांमुळे  होते.  त्याचबरोबर दैनंदिन कामकाजातील माणसे मनाचा थकवा घालवण्यासाठी पर्यटन सहलीचे आयोजन केले जाते.  हिरव्यागार वनस्पतीनी अच्छादलेली पर्वतरांग ही आपणास नेत्र सुखाचा अवर्णनीय आनंद देऊन जात असल्याचे सौ. चोरमल यांनी सांगितले.

मानवाच्या जीवनामध्ये वृक्षाला खूप मोठे महत्व व स्थान आहे. वनस्पतींना हि हृदय आहे सांगणारे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ जगदीश बोस व संत तुकाराम महाराज यांनी तर आपल्या अभंगात सुद्धा वृक्षाचे रमहत्त्व सांगताना वृक्षवल्ली आम्हा सोयरे  असे म्हटले आहे. आयुष्यात जशी आपली जवळची माणसे आनंद व सुख देतात तसेच वृक्ष सुद्धा सुख देतात. म्हणून ढासळलेल्या पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर प्रत्येकाने एक वृक्ष लावणे व तो जोपासणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे शेवटी सौ. चोरमले यांन सांगितले.

महात्मा शिक्षण संस्था संचलित, मूकबधिर विद्यालय परिसरामध्ये वृक्ष लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!