पिंपरद येथे कृषीकन्यांनी राबविला वृक्षारोपणाचा कार्यक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या व कृषी महाविद्यालय फलटण येथील अंतिम वर्षातील कृषीकन्यांमार्फत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पिंपरद येथे ७६ स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी पिंपरद गावच्या सरपंच स्वाती भगत, उपसरपंच सागर बोराटे, गावचे पोलीस पाटील सुनिल बोराटे, मार्केट कमिटीचे अध्यक्ष किरण भैया शिंदे तसेच ग्रामस्थ व छावा ग्रुपचे युवा नेते व जिल्हा प्राथमिक शाळेचा शिक्षकवर्ग उपस्थित होते.

ग्रामपंचायतच्या सभोवताली आणि प्राथमिक शाळेच्या प्रांगणात १० वेगवेगळ्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यामध्ये अशोका, चिंच, जांभूळ, निलगिरी, वड, पिंपळ व इतर झाडांचा समावेश केला गेला. तसेच यावेळी कृषीकन्यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले. कारण सध्याच्या स्थितीत ग्लोबल वॉर्मिंगची पातळी वाढत असल्याने आपल्याला झाडे लावणे व जगवणे हे खूप महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे नागरिकांना व विद्यार्थ्यांना कृषीकन्यांनी प्रबोधित केले.

कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु.डी. चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर व कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणिता गोडसे, निशिगंधा खुडे, प्रतिक्षा जगताप, अक्षदा जाधव, समृद्धी जगताप, आरती जाधव, आर्या जाधव यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविला.


Back to top button
Don`t copy text!