दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त, कृषी महाविद्यालय फलटण येथील अंतिम वर्षातील कृषी दूतांमार्फत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सोनवडी खुर्द येथे ७६ स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सोनवडी खुर्द गावच्या सरपंच शालन सूर्यवंशी, उपसरपंच शरद सोनवलकर, गावचे पोलीस पाटील सचिन सूर्यवंशी, ग्रामसेवक एस बी निंबाळकर तसेच ग्रामस्थ व जिल्हा प्राथमिक शाळेचा शिक्षकवर्ग उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या सभोवताली आणि प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ७५ वेगवेगळ्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यामध्ये गुलमोहर, आंबा, चिंच व इतर झाडांचा समावेश केला गेला. तसेच यावेळी कृषीदूतांनी वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले. कारण सध्याच्या स्थितीत ग्लोबल वॉर्मिंगची पातळी वाढत असल्याने आपल्याला झाडे लावणे व जगवणे हे खूप महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे नागरिकांना व विद्यार्थ्यांना कृषीदूतांनी प्रबोधित केले.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु.डी. चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालय कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शुभम आडके, भूषण गायकवाड, शुभम कोकणे, अंगद कागणे, गणेश कोळेकर, केदार घनवट, दुर्वेश बोराटे यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविला.