दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑगस्ट २०२३ | बारामती |
रक्षाबंधननिमित्त हनुमाननगर येथील महिला बचत गटाच्या वतीने ‘सवित्री बन’, पणदरे या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी हनुमाननगर बचत गटाच्या अध्यक्षा अर्चना सातव, पणदरे ग्रामविकास मंचचे पदाधिकारी सचिन कुंभार, राजेश साळुंखे, गणेश जगताप, संतोष शेलार, राजेश कोकरे, हर्षदा सातव, माधवी शेडगे, सुप्रिया सूर्यवंशी, सारिका रणदिवे, वैशाली गायकवाड, वर्षा पाचांगणे, शुभांगी तावरे आदी सदस्या व मान्यवर उपस्थित होते.
दुष्काळाचे सावट तीव्र होत असताना वृक्षारोपणच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण झाले पाहिजे म्हणून वेगळा उपक्रम म्हणून रक्षाबंधननिमित्त वृक्षारोपण केल्याचे हनुमाननगर बचत गटाच्या वतीने सांगण्यात आले.
पणदरे ग्रामविकास मंचच्या तरुणांनी एकत्र येऊन फॉरेस्टमध्ये वनराई फुलवली आहे. देशी झाडे लावली जातात आणि ती जगवलीही जातात. एक शेततळे बनवून झाडे, पशूपक्षी, प्राण्यांची पाण्याची सोय केली आहे. पाऊस न पडल्याने सर्वत्र दुष्काळाचे सावट पसरले असताना सावित्री बनात झाडे जगली असल्याचे संजय कोकरे यांनी सांगितले.