दैनिक स्थैर्य | दि. २८ सप्टेंबर २०२४| फलटण |
माऊली फाऊंडेशन मुंबई यांच्या वसुंधरा संवर्धन मोहिमेअंतर्गत माऊली फाउंडेशन आणि फलटण बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश चतुर व सर्व न्यायाधीश, विधीज्ञ, पक्षकार यांच्या उपस्थितीत शनिवारी विमानतळ बिल्डिंग आवारामध्ये पर्यावरक पूरक रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. वकील संघाच्या पर्यावरणप्रेमी विधिज्ञांनी रोपांची जोपासना आणि संगोपनाची जबाबदारी घेतली आहे. विशेषतः अॅड. झोरे यांनी झाडांना पाणी नियमित मिळावे म्हणून ठिबक सिंचनाची सोय करून देण्याची जबाबदारी घेतली आहे.
याप्रसंगी बार असोसिएशनचे अध्यक्ष बापू सरक, वकील संघाचे इतर पदाधिकारी, अॅड. डी जी. शिंदे , अॅड. शेडगे, अॅड. मेघा अहिवळे, अॅड. साठे, माऊली फाऊंडेशनचे सदस्य अॅड. राहुल कर्णे, अॅड. नामदेव शिंदे, अॅड. धीरज टाळकुटे, अॅड. राहुल सतूटे, अॅड. दत्तात्रय कांबळे, अॅड. रोहिणी भंडळकर, अॅड. राहुल बोराटे, अॅड. रामचंद्र घोरपडे, कांबळे, तात्या गायकवाड, नीता दोशी, संगिनी फोरमच्या खजिनदार मनिषा घडिया आणि ज्येष्ठ पक्षकार केरु चिमाजी शिंदे, गुलाब नारायण शिंदे इतर सेवेकरी हजर होते.