
दैनिक स्थैर्य | १० ऑक्टोबर २०२२ | फलटण | महाराष्ट्र खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण- कोरेगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिपकराव चव्हाण यांच्या हस्ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस फलटण तालुका ,मुधोजी महाविद्यालय, फलटण माळजाई मंदिर उद्यान समितीचे अध्यक्ष प्रतापसिंह निंबाळकर यांच्या संयुक्त विद्यमाने मुधोजी कॉलेज रिंग रोड परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी माळजाई मंदिर उद्यान समिती अध्यक्ष प्रतापसिंह निंबाळकर मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.कदम उप प्राचार्य दिक्षीत ज्युनिअर कॉलेज प्राचार्य वेदपाठक माजी प्राचार्य इंगळे अमरजीत नाईक निंबाळकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक , तसेच विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर कदम ,तालुकाध्यक्ष अभिजीत निंबाळकर , कार्याध्यक्ष आकाश यादव , उपाध्यक्ष निरंजन पिसाळ , सरचिटणीस प्रतिक पवार , गौरव पवार , संघटक स्वप्नील पिसाळ , प्रथमेश शेलार , प्रसाद जाधव, प्रताप नाळे उपस्थित होते.