दैनिक स्थैर्य । दि. २६ जुलै २०२३ । मुंबई । सम्यक कोकण कला संस्था (रजि) आणि साक्षी सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने वनविभाग, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई येथे नियोजित विपश्यना केंद्र येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. नवी मुंबईतील उद्योजक व समाजसेवक मा. विरेंद्रजी लगाडे साहेब हे साकारत असलेल्या विपश्यना केंद्राच्या ठिकाणी बोधिवृक्षासह इतर झाडांची लागवड करावी ह्या विरेंद्रजी लगाडे साहेब आणि सम्यक कोकण कला संस्थेचे कार्याध्यक्ष मा. भगवानदादा साळवी ह्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न झाला.
सदर प्रसंगी उपस्थित महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन बौद्धाचार्य आदरणीय अशोक भद्रे गुरुजी ह्यांनी सामुदायिक बुध्द वंदना घेतली. त्यानंतर सम्यक कला संस्थेचे अध्यक्ष मा. मंदारजी कवाडे साहेबांनी उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविक सादर केले. तदनंतर नियोजित विपश्यना केंद्र परीसरात वृक्षारोपण करण्यात आले. ह्यामध्ये बोधिवृक्ष, आंबा, फणस यांसह विविध चाळीस झाडांची लागवड करण्यात आली. ज्यावेळी हे विपश्यना केंद्र पूर्णत्वास जाईल तेव्हा बोधिवृक्षासह ही झाडे डौलाने उभी राहिलेली असतील आणि येणाऱ्या उपासकांना त्याचा फायदा होईल. सदर प्रसंगी शंभरावर महिला, पुरुष आणि मुले उपस्थित होते. वृक्षारोपण झाल्यानंतर सम्यक कला संस्थेच्या कलाकारांनी प्रबोधनात्मक गीते गाऊन उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर मा. भगवानदादा साळवी व मा. लगाडे साहेब यांच्यातर्फे उपस्थितांना भोजनदान करण्यात आले. सर्वांना भोजन वाढण्याचे पुण्यकर्म मा. विरेंद्रजी लगाडे साहेब ह्यांच्या पत्नी मनीषाताई लगाडे ह्यांनी आनंदाने पार पाडले.
सदर कार्यक्रमाला उद्योजक व समाजसेवक मा. विरेंद्रजी लगाडे साहेब, सम्यक कोकण कला संस्थेचे कार्याध्यक्ष – समाजसेवक मान. भगवानदादा साळवीसाहेब यांच्यासह सम्यक कोकण कला संस्थेचे आयु. मंदार कवाडे (अध्यक्ष), आयु. मुकुंद तांबे (उपाध्यक्ष), आयु. विनोद धोत्रे (उपाध्यक्ष), आयु. मोहन थोरात (उपाध्यक्ष), आयु. नरेश शिंदे (सरचिटणीस), आयु. सुभाष सावंत (खजिनदार), आयु. चंद्रमणी घाडगे (सल्लागार), आयु. चंद्रकांत तांबे (प्रसिद्धी प्रमुख), कवी आयु. संघप्रिय कदम (सदस्य), गौतम पवार (सदस्य), सुप्रसिद्ध गायिका पुजा मासूम, सुप्रसिद्ध गायिका मीनाक्षीजी थोरात, सुप्रसिध्द गायिका अनिता गायकवाड, थोर समाजसेविका गौतमीताई जाधव, समाजसेविका देवळेकर ताई तर साक्षी सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आयु. कैलास सरकटे, सचिव आयु. श्यामसुंदर लगाडे, खजिनदार आयु. प्रेमनाथ इंगळे व कार्यकारी मंडळातील बुधा ठाकूर, मधुकर क्षीरसागर, किरण पारधी, दिपक वाघ, संतोष नरवडे, नानाभाऊ कानडे, संजय पाटील, दत्ता बनसोडे, समाधान इंगळे, छगन खंडारे, मांगो लोखंडे, राहुल शिरसाठ, विनोद कांबळे, जगन्नाथ निकम, पुंडलिक कांबळे, रामा ठाकूर, महादेव सिंग, सौ. सूनंदाताई बाविस्कर, मियासा शेख, समाधान सरकटे, लक्ष्मण देडे, राजु राठोड, प्रभाकर जिदो, कमलाकर हनवते ह्यांनी ह्या कार्यात सहभाग घेतला. कवी – गायक आयु. संदीप यादवजी ह्यांनी सर्वांच्या प्रवासाची स्वतःच्या गाडीने व्यवस्था केली. आदिवासी संस्थेने सदर जागेची साफसफाई केली व कार्यक्रमात सहभाग घेतला. महाकवी आदरणीय नाथा जाधव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
सरतेशेवटी लगाडेसाहेब ह्यांनी तेथील प्रमुख म्हणून, तर भगवानदादा साळवी ह्यांनी सम्यक कोकण कला संस्थेच्या वतीने उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.