श्री संत सावता महाराज मंदिर परिसरात बहावाच्या रोपांची लागवड


दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटण येथील श्री संत सावता महाराज मंदिर ट्रस्ट यांच्यामार्फत मंदिर परिसरामध्ये बहावाची झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले.

बाहावा हे देशी म्हणजे भारतीय वंशाचे झाड आहे आणि केरळ राज्याचे राज्यफुल आहे. इतरवेळी साधारण दिसणारे झाड उन्हाळ्यात फारच सुंदर दिसतं. कारण याची सुंदर पिवळीधमक फुले अनेक रोगांवर गुणकारी आहेत.

वृक्षारोपण करताना ट्रस्टचे डायरेक्टर विजय शिंदे, पुंडलिक नाळे, रणजित भुजबळ, ट्रस्टचे सेक्रेटरी गणपत नाळे, भावी नेते मधुकर भुजबळ, रमेश शिंदे, नानासाहेब शेंडे, मंदिराचे पुजारी किसन जाधव, धीरज बोरावके उपस्थित होते.

या उपक्रमास संस्थेचे चेअरमन दादासाहेब शेंडे यांनी शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!