हरीत वसुंधरा आणि हर घर झाड उपक्रमांतर्गत १२०० वृक्ष रोपण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १३ जुलै २०२३ । गोखळी । हरीत वसुंधरा आणि हर घर झाड या डॉ. महेश बर्वे यांच्या संकल्पनेतील उपक्रमांतर्गत खटकेवस्ती, ता. फलटण येथील देवराई प्रकल्पात एकाच दिवशी १२०० वृक्ष रोपांचे रोपण मोठ्या उत्साहात करण्यात आले.

जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने आयोजित आपला गाव वृक्षोत्सवांतर्गत डॉ. महेश बर्वे यांच्या प्रयत्नाने फलटण तालुक्यात १ लाख वृक्ष रोपणाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून खटकेवस्ती येथे वनविभागाच्या जागेवर ग्रामस्थांनी उभारलेल्या देवराई वन प्रकल्पात नव्याने सुमारे ५ हजार झाडे लावून त्याची जोपासना केली जाणार आहे. याचा प्रारंभ खटकेवस्ती येथे करण्यात आला. खटकेवस्ती आणि गोखळी ग्रामस्थ, वन व्यवस्थापन समिती खटकेवस्ती आणि फलटण वनविभाग यांचे संयुक्त सहभागाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ५ हजार वृक्षांपैकी पहिल्या टप्प्यात १२०० देशी झाडांचे वृक्षारोपण डॉ. महेश बर्वे व अन्य डॉक्टर्स आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या वृक्षांसाठी पाण्याची व्यवस्था खटकेवस्ती येथील पर्यावरण प्रेमी विकास चंद्रकांत गावडे यांनी  स्वतःच्या विहिरीचे पाणी दिले आणि हरीत वसुंधरा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. फलटण डाॅक्टर्स असोसिएशन मधील डॉक्टरांनी सिंहांचा वाटा उचलला असून रोपाना पाणी देण्यासाठी व खड्डे खोदाई, पाण्याची  तयारी, पोकलेन चालक सावळाराम गावडे, सागर चव्हाण, ड्रीपचे गौरव जरांडे, कमी वेळात पाईपलाईन, ड्रीप भागवत दडस व सुभाष मदने यांच्या अथक प्रयत्नामुळे पूर्ण झाले.

सामाजिक वनीकरण विभागाचे वन क्षेत्रपाल दिगंबर जाधव आणि दालवडी येथील जाधव नर्सरी यांनी वृक्ष रोपांचा पुरवठा केला. एकदंताय सामाजिक संस्था खटकेवस्तीचे सागर चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी झाडे आणणे आणि लावणे यासाठी सहकार्य केले. हनुमान माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनी वृक्ष रोपे वाहून नेवून खड्यांमध्ये  वृक्षारोपण केले, झाडांना बादलीने पाणी घातले. प्राचार्य हरीभाऊ अभंग व त्यांचे सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सुप्रिया धायगुडे, शुभांगी भोसले, किरण पवार, राजेंद्र भागवत, शरद निकाळजे यांनी वृक्षारोपण कार्यात सक्रिय सहभाग घेतला.   डॉ. विकास खटके, रमेशदादा गावडे, राजू गावडे, विकास गावडे, सुभाष खटके, सुमित खटके, रणवीर खटके, जितेंद्र फडतरे आणि व्यसनमुक्ती संघाचे सर्व सहकारी, डॉ. शिवाजी गावडे, रजनीकांत खटके, डॉ. हणमंत गावडे, डॉ. नितीन गावडे, डॉ. सुखदेव नाझीरकर, खटकेवस्तीचे पोलिस पाटील राजेंद्र धुमाळ, बालचमु प्रथमेश व अहिल्या खटके, मल्हार खटके यांनी सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत खोदलेल्या खड्यांमध्ये वृक्षारोपण केले. एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात घेतलेल्या परिश्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Back to top button
Don`t copy text!