सर ज जी कला महाविद्यालयाचा नियोजनबद्ध विकास करावा – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०३ मार्च २०२२ । मुंबई । राज्य शासनाने सर ज जी कला महाविद्यालयाच्या सर्वांगीण  विकासासाठी आतापर्यंत 30 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. कला महाविद्यालयाने नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करून सर ज जी महाविद्यालयाचा विकास करावा, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केल्या.

कला संचालनालय तर्फे आयोजित 61 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन समारोपप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.सामंत बोलत होते. यावेळी कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा, वसंत सोनवणी, मनीषा सुर्वे, गणेश तरतरे आदी उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत म्हणाले, कला महाविद्यालयाची कीर्ती जगभर पसरली आहे. येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या सुविधा दिल्या पाहिजेत. त्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल. कला महाविद्यालयाच्या अडचणी लक्षात घेऊन नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात यावा.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते वसंत सोनवणी यांचा सत्कार करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!