कराचीमध्ये विमान कोसळले : ९८ जणांचा मृत्यू झाल्याची भीती (पहा VDO)

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


अपघातग्रस्त विमानात 91 प्रवासी आणि 8 क्रू मेंबर्स असे एकूण 99 जण होते

 स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 22 :  PK8303 नावाचं हे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स (PIA) चं विमान होतं. दुपारी एक वाजता लाहोरहून हे विमान कराचीच्या दिशेनं झेपावलं. मात्र, कराची विमानतळावर उतरण्याआधीच ते अगदी जवळच असणाऱ्या जिना गार्डन या रहिवाशी भागात कोसळलं.

काही प्रत्यक्षदर्शींनी या दुर्घटनेचे व्हीडिओ शूट केले. त्यानुसार, घटनास्थळावरील गाड्यांनाही आग लागलेली दिसून येतेय. तसंच, या अपघातानंतर घटनास्थळावर धुराचे लोट दिसले.

कराची पाकिस्तानचं व्यापारकेंद्र मानलं जातं. येथील जिना इंटरनॅशल एअरपोर्ट पाकिस्तानातील सर्वात व्यग्र विमानतळ मानलं जातं.

कोरोना व्हायरसमुळं लागू करण्यात आलेलं लॉकडाऊन उठवल्यानंतर पाकिस्तानात हवाई वाहतूक सुरू करण्यात आली होती. पाकिस्तानी सैन्याकडून बचावकार्यासाठी घटनास्थळी धाव घेण्यात आलीय.

पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी आर्मीचे हेलिकॉप्टर बचावकार्यासाठी घटनास्थळी गेले आहेत. अर्बन सर्च अँड रेस्क्यू टीमही घटनास्थळाकडे पाठवण्यात आल्यात.

पाकिस्तानातील तिसरी मोठी दुर्घटना

हवाई दुर्घटनेची आकडेवारी गोळा करणारी संस्था एअरक्राफ्ट क्रॅश रेकॉर्ड ऑफिसच्या माहितीनुसार, पाकिस्तानात आतापर्यंत 80 हून अधिक विमान दुर्घटना घडल्यात. या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत तीन हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय.

पाकिस्तानात सर्वात मोठा विमान अपघात इस्लामाबादजवळ 28 जुलै 2010 रोजी झाला होता. या अपघातात 152 जणांचा मृत्यू झाला होता.

20 एप्रिल 2012 रोजीही इस्लामाबादमध्येच अपघात झाला होता. त्यात 127 जणांचा मृत्यू झाला होता.

या दोन घटनांनंतर सर्वात मोठा अपघात आज कराचीत झालेला अपघात मानला जातोय.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!