दैनिक स्थैर्य । दि. २० डिसेंबर २०२१ । सातारा । आनेवाडी,रायगाव,सायगाव,महामुलकरवाडी व खर्शी तर्फ कुडाळ या पाच गावांतील मयत व्यक्तींचा अंत्यविधी कुष्णा नदीच्या काठी पूर्व परंपरेने केला जात आहे.गेली अनेक वर्षे येथे जागे अभावी उघड़यावरच अंत्यसंस्कार करावे लागत होते,मात्र आता ग्रामपंचायतींने जागा उपलब्ध केली असून मंजूर स्मशानभूमिचे कामही सुरु असताना गावातील एका पुढाऱ्याने दुसऱ्या स्मशानभूमिचा घाट घालून कोणतीही परवानगी न घेता नदी पात्रातच या स्मशानभूमिचे बांधकाम अवैद्य पद्धतीने चालु केले असून ,पहिल्या पावसातच जलसमाधी मिळालेल्या या स्मशानभूमिचा उपयोग काय असा सवाल करत बेकायदेशीरपने नदिपात्रात सुरु असलेल्या या स्मशानभूमिसंदर्भात निवेदन सरपंच शिवाजी गोरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थानी जिल्हाधिकारी तसेच जावेळी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना दिले आहे,
निवेदनात संगीतल्याप्रमाणे ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा नसल्यामुळे गेले अनेक वर्ष स्मशान भूमीसाठी निधी मंजूर होऊन परत गेला आहे.त्यासाठी आनेवाडीचे महाराष्ट्र भूषण लोकशाहीर पुंडलिक फरांदे यांच्या वारसांनी पावसाळ्यांतील एक-दोन वेळा दहण केलेल्या मृतांची हेळसांड पाहिली व त्यांनी स्वःमालकीची पाच गुंठे जागा आनेवाडी ग्रामपंचायतीला बक्षिस पत्र करुन दिली आहे.व त्यामध्ये ही जागा स्मशानभूमीसाठीच वापरण्यात यावी त्यासाठीचा होणारा खर्चही ग्रामस्थानी लोकवर्गनिमधून केला होता,त्या ठिकाणी मा.आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्ननातून आठ लाख रुपयाचा निधी मिळून स्मशानभूमीचे काम सुरु रोजी सुरु झाले. बांधकामाचे पिलर उभे केले नंतर आनेवाडी ग्रामपंचायतीला मर्ढे ग्रामपंचायतीने नदीपात्रात हरकतीचे पत्र दिले. त्यानंतर मर्ढे ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी प्रत्येक गावातील प्रतिनिधी मर्ढे येथे गेली,परतुं निष्पन काही झाले नाही,त्यानंतर मर्ढे ग्रामस्थांनी मा.जिल्हाधिकारी याचेकडे लेखी तक्रार अर्ज दिला त्यांची चौकशी होऊन जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी आनेवाडी ग्रामपंचायतीला जागेची मोजणी करून देण्यास सांगितले,त्याप्रमाणे जागेची मोजणी केली.त्यानंतर अगोदर नियुक्त केलेली जागा रद्द करून नदीपात्रापासून दूर अंतरावर जागा निवडली. सदरची जागा जावळीचे गटविकास अधिकारी श्री.बुद्धे साहेब यांनी पाहणी करून, त्या ठिकाणी बांधकाम करण्यास हरकत नाही असे सांगितले.असे असताना मार्च २०२१ पर्यत सदरचा निधी खर्च न पडल्यामुळे परत गेला. गटविकास अधिकारी यांनी सांगितले की,निधी येण्यास वेळ लागेल तोपर्यंत चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामसभेने सुचवलेल्या कामांना मंजुरी मिळाली असेल ती कामे सुरु करावीत. त्याप्रमाणे त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी (शेड) मंजूर होते,त्याचे काम पंचायत समिती ,जावली याचेमार्फत सुरु करण्यास आले आहे.मात्र २०२१ पासून आनेवाडी येथील नागरिक राजेंद्र रामचंद्र फरांदे (दादा पाटील )यांनी काहीना बरोबर घेऊन आनेवाडी व मर्ढे वाहतुकीसाठी नदीवर असलेल्या पुलाच्या उत्तर बाजूला दुसऱ्या नदीपात्रातच बेकायदेशीरपने कोणतीही परवानगी न घेता स्मशानभूमीचे काम सुरु केले आहे.सदरचे बांधकाम पूर्ण नदीपात्रात असून त्याबाबत कोणताही परवाना घेतलेला नाही किंवा आनेवाडी ग्रामपंचायतीला देखील कळविले नाही. सदरचे काम सुरु झाल्यामुळे वरील गावाच्या ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले असून सदरची जागा पावसाळ्यात कायम पाण्याखाली राहणार असून पुलावर पाणी असते त्यावेळी तेथे पायी चालत जाता येत नाही.अशा ठिकाणी अंत्यविधी केलेस त्या प्रेताची हेळसांड होणेची शक्यता नाकारता येत नाही.त्याशिवाय जेष्ठ नागरिक ,स्त्रिया,यांना त्या ठिकाणी पोहचणे पावसाळ्यात चार महिने अत्यंत धोक्याचे आहे.
तरी वर वर्णन केलेल्या बांधकामाची पाहणी करुन योग्य ती कार्यवाही व्हावी.व वरील पाच गावाच्या नागरिकामध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे ते दूर करावे. आनेवाडी ग्रामपंचायतीला मा. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्मशानभूमीसाठी वीस लाख रुपये मंजूर करण्यात यावे असे शिफारस पत्र देखील दिलेले आहे.याशिवाय आनेवाडी ग्रामपंचायतीने पंधराव्यावित्त आयोगातून बोअर,इलेक्टी्क मोटर व पाण्याची टाकी यासाठी वित्त आयोगामध्ये तरतूद केलेली आहे. तसेच स्मशानभूमी सुशोभीकरण करण्यासाठी सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे.
याशिवाय महाराष्ट्र राज्य विधुत मंडळाकडे लाईटचे कनेक्शन मिळणेबाबत प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे सम्भरम निर्माण करणाऱ्या या स्मशानभूमिची प्रशासनाने पाहणी करून योग्य तो निर्णय घ्यावा अशे मत सरपंच शिवाजी गोरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य यांचे मत आहे,निवेदनावर उपसरपंच पोपट चव्हाण,किरण फ़रांदे,सुनीता फरांदे,शेखर फ़रादे,अश्विनी फ़रंदे,यशवंत फ़रंदे सुनील फ़रांदे, वैभव फ़रांदे,रामचन्द्र चव्हाण,दिलीप फ़रंदे,जयसिंग फ़रांदे यांच्या सह्य आहेत, कोणतीही पूर्व कल्पना न देता बेकायदेशीरपने नदीपात्रात काम करणाऱ्या या गावपुढाऱ्यावर महसूल विभाग कार्रवाई करनारा का असा सवाल ग्रामस्थानमधुन होत आहे,