बेरोजगार उमेदवारांसाठी दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी प्लेसमेंट ड्राईव्ह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ जानेवारी २०२३ । सातारा । जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील रिक्त पदांवर बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी प्लेसमेंट ड्राईव्ह होणार आहे. तरी जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.

गरजु विद्यार्थ्यांनी कौशल्य विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करुन ऑनलाईन अर्ज करावा व स्वखर्चाने आपल्या कागदपत्रांसह प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले आहे.

0000

जी.डी.सी. ॲण्ड सी.एच.एम. परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा दि. 5  :   शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी.डी.सी. ॲण्ड ए बोर्ड) मंडळाकडून जी.डी.सी. ॲण्ड सी.एच.एम. परीक्षा दि. 26, 27 व 28 मे 2023 रोजी केंद्र सातारा संकेतांक 12 येथे घेण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 5 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे. ऑनलाईन अर्ज https//:gdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करावेत. परीक्षार्थींना ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अटी व शर्ती सविस्तर https//:sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, अशी माहिती सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!