‘अचानक’ मंडळाचा अभिमान! पियुष आगवणे यांची तालुका कृषी अधिकारीपदी निवड


एमपीएससीतून तालुका कृषी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल पियुष उमेश आगवणे यांचा अचानक गणेशोत्सव मंडळाकडून सत्कार.

स्थैर्य, फलटण, दि. २२ फेब्रुवारी : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) तालुका कृषी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल चिरंजीव पियुष उमेश आगवणे यांचा अचानक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गौरव सत्कार करण्यात आला.

अचानक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य श्री मंगेश आगवणे यांचे पुतणे असलेल्या पियुष यांच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले.

या प्रसंगी मंडळाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. वक्त्यांनी पियुष यांच्या मेहनतीचे व चिकाटीचे कौतुक करत तरुणांनी स्पर्धा परीक्षांकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, असे आवाहन केले.

तालुका कृषी अधिकारी म्हणून निवड झाल्याने कृषी क्षेत्रात कार्य करण्याची मोठी जबाबदारी पियुष यांच्यावर येणार आहे. शेतकरी व ग्रामीण विकासासाठी त्यांनी प्रामाणिकपणे काम करावे, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.

या सत्कार समारंभामुळे युवकांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी प्रेरणा निर्माण झाली असून गावातील नागरिकांनीही पियुष आगवणे यांच्या यशाचा आनंद साजरा केला.


Back to top button
Don`t copy text!