कल ओळखून शिक्षण घेतल्यास यशाचे शिखर : आनंद जोशी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ सप्टेंबर २०२२ । फलटण । विद्यार्थ्यांनी आपले करियर यशस्वी होण्यासाठी त्यांनी स्वत:चा कल ओळखून शिक्षण घेतल्यास यशाचे शिखर गाठता येते असे विचार प्रोजेक्ट मॅनेजर आनंद जोशी यांनी विद्यार्थी गुणगौरव समारंभात मांडले.

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था फलटण केंद्रातर्फे इयत्ता १० वी व १२ वी गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव व शिष्यवृत्ती वाटप समारंभ प.पू. उपळेकर महाराज मंदिर फलटण येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लिडरशिप फॉर इक्विटी पुणे चे प्रोजेक्ट मॅनेजर आनंद जोशी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्रा.शांताराम आवटे होते.

प्रारंभी केंद्रप्रमुख विजय ताथवडकर यांनी सर्वांचे स्वागत करुन या केंद्रामार्फत भरगच्च कार्यक्र्माचे आयोजन केले जाते. विद्यार्थी गुणगौरव हा त्यातील एक महत्वाचा कार्यक्रम आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शुभंकर देवरे, सिध्दी इनामदार, समीर ठोंबरे, श्रावणी केसकर, श्रवण फडके, सई फौजदार, सिध्दी इनामदार, श्रावणी पटवर्धन, वरद इनामदार, श्रेयस देशपांडे, दीपक देवळे,अथर्व बर्वे, युगंधरा रुद्रभटे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला. तर आश्लेषा आठल्ये, वैष्णवी देशपांडे, अक्षदा कुलकर्णी, प्रथमेश बिडवे यांना रोख शिष्यवृत्ती देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय तालुक्यातील विशेष पदवी प्राप्त करुन उत्तम करियर घडविणार्‍या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात प्रा. शांताराम आवटे यांनी या केंद्राच्या विविध कार्यक्रमाच्या कार्याची प्रशंसा केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिरुध्द रानडे यांनी केले तर आभार नंदकुमार केसकर यांनी मानले. कार्यक्रमास निमंत्रित, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!