दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२३ । मुंबई । पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने उपयोगकर्ता शुल्कासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. तो रद्द करावा या मागणीच्या अनुषंगाने उचित निर्णयासंदर्भात लवकरच एक बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येईल. तोपर्यंत तेथील करवसुलीसाठी स्थगिती देण्यात येत असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य महेश लांडगे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री. सामंत यांनी उत्तर दिले.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिके मार्फत आजपर्यंत 30.44 कोटी इतकी रक्कम उपयोगकर्ता शुल्क म्हणून आजपर्यंत वसूल करण्यात आलेला आहे. मात्र, हे उपयोगकर्ता शुल्क वसुली रद्द करण्यासंदर्भात वारंवार लोकप्रतिनिधी, संघटना आणि नागरिकांच्या मार्फत महानगरपालिकेकडे मागणी होत आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव विचाराधीन असून कायदे, नियम, तरतूदी आणि आर्थिक बाबी तपासून याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी सदस्य प्रणिती शिंदे आणि वर्षा गायकवाड यांनी यावेळी चर्चेत सहभाग घेतला.