
दैनिक स्थैर्य । दि. १९ मार्च २०२२ । खंडाळा । पिंपरे बु. ता खंडाळा येथील पिंपरे बु. विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या निलेश लक्ष्मण कापसे यांची तर व्हाईस चेअरमनपदी सुखदेव साहेबराव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या पिंपरे बु. विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी श्री भैरवनाथ शेतकरी विकास पॅनेलने सलग तिसऱ्यादा सोसायटी जिंकुन विजयाची हॅट्रीक केली आहे.
संपुर्ण खंडाळा तालुक्याचे लक्ष लागुन राहिलेल्या पिंपरे बु. विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीमध्ये खंडाळा साखर कारखान्याचे संचालक धनाजी अहिरेकर,जगन्नाथ धायगुडे, शांताराम धायगुडे,संतोष शिंदे, देवीदास चव्हाण,विनायक बिचुकले यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पार्टी पुरस्कृत श्री भैरवनाथ शेतकरी विकास पॅनेलने पिंपरे गावचे माजी उपसरपंच संभाजी घाडगे,लोणंद बाजार समितीचे उपसभापती दत्तात्रय बिचुकले, बाळासो केसकर,विक्रम धायगुडे यांच्या नेतृत्वाखालील श्री भैरवनाथ परिवर्तन पॅनेलचा सुमारे ९० ते १०० मताच्या फरकाने दारुण पराभव करत सलग तिसऱ्यांदा पिंपरे बु. विकास सोसायटी मोठया मताधिक्कयाने ताब्यात घेतली आहे.पिंपरे बु. विकास सेवा सोसायटीच्या निवडीमध्ये चेअरमनपदी निलेश कापसे यांची तर व्हाईस चेअरमनपदी सुखदेव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यावेळी धनाजी अहिरेकर, शांताराम धायगुडे,संतोष शिंदे,
संतोष चव्हाण,हरिभाऊ धायगुडे, अंकुश ननावरे,मुगुट धायगुडे, दत्तात्रय भुजबळ,लता जाधव, रुपाली यादव,प्रमोद सोनवणे आदी संचालक व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन ज्ञानेश्वर चव्हाण यांनी काम पाहिले त्यांना सचिव सयाजी शिंदे यांनी सहकार्य केले. चेअरमन निलेश कापसे व व्हा चेअरमन सुखदेव शिंदे यांचे आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदयदादा कबुले, जिल्हा बॅक संचालक दत्तानाना ढमाळ,कृषी सभापती मनोज पवार, खंडाळा कारखाना उपाध्यक्ष राजेंद्र तांबे,जिल्हा परिषद सदस्या दिपाली साळुंखे,सभापती अश्विनी पवार,उपसभापती वंदनाताई धायगुडे आदी मान्यवर
सर्व सभासद व ग्रामस्थानी अभिनंदन केले आहे.