दैनिक स्थैर्य | दि. २६ मार्च २०२३ | फलटण |
धवल (ता. फलटण) गावच्या हद्दीत २४ मार्च रोजी दुपारी ३.०० वाजण्याच्या सुमारास पिकअप गाडीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात चालक ठार झाला आहे. या अपघाताची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून शोकत दिलावर शेख (वय ६०, रा. हडको कॉलनी, ता. फलटण) असे मृताचे नाव आहे.
या अपघाताची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, धवल, तालुका फलटण गावचे हद्दीत सागर हॉटेलजवळ पुसेगावहून फलटणकडे येत असताना शोकत दिलावर शेख हे पिकअप गाडी नंबर mh11bl5380 चालवत होते. त्यावेळी त्यांचा गाडीवरील ताबा सुटून अपघात झाला. या अपघातामध्ये शेख यांच्या छातीला गाडीच्या स्टेअरिंगचा दणका बसून गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
या अपघाताची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दीक्षित करत आहेत.