फिजियोथेरेपी गुडघेदुखी वरती एक रामबाण उपाय !

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : गुडघेदुखी  हल्ली सर्वसामान्य झालीय. पूर्वी वाढत्या वयात व्हायची. पण हल्ली हा त्रास तरुणांमध्येही आढळतो. आधुनिक व पाश्चात्य जीवनशैलीमुळे मधुमेह, हृदयविकारासोबत सांधेदुखी व गुडघेदुखीच्या आजाराने डोके वर काढले आहे. महिलांमध्येही शारीरिक बदलांमुळे गुडघेदुखी वाढलेली दिसत आहे. गुडघेदुखीमुळे अनेक जण डॉक्टरांकडे उपचारासाठी जात असतात. पण अनेक बराच काळ औषधं घेऊनही उपयोग होत नाही. दुखणं जैसे थे राहातं.

गुडघेदुखीचा त्रास केवळ वृद्ध मंडळींनाच होतो असे नाही. वयाच्या ४५ वर्षांनंतर पुरुष व स्त्रिया अशा दोघांमध्ये हा आजार मोठय़ा प्रमाणात दिसतो. त्यातही रुग्णांमध्ये स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. ४५ ते ६४ या वयोगटात ३० टक्के, तर ६५ वर्षांनंतर ६८ टक्के महिलांमध्ये गुडघेदुखी आढळत असल्याचे एका पाहणीतून निदर्शनास आले आहे.

 गुडघेदुखी ची कारणे:- 

गुडघेदुखीची अनेक कारणे आहेत. ते जाणण्यासाठी गुडघ्याची रचना माहीत असणे गरजेचे आहे. चार वेगवेगळी हाडे मिळून गुडघा तयार होतो. याबरोबर मांसपेशी, ‘टेंडन्स’, ‘कार्टीलेज’ आणि ‘लिगामेन्ट्स’ यांचाही गुडघा तयार होण्यात समावेश असतो. त्यावर एक ‘सायनोवीयल सॅक’ नावाचे आवरण असते व ते एक द्रव्य तयार करते. त्याला ‘सायनोवियल फ्लुईड’ म्हणतात. गुडघ्याच्या हालचालींसाठी हे द्रव्य अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या शरीराचे संपूर्ण वजन गुडघ्यावर असते.

शारीरिक कार्यांदरम्यान किंवा अनावश्यक ताणल्यामुळं, अतिवापर केल्यानं सामान्यतः गुडघेदुखी उत्पन्न होते.  अतिलठ्ठपणामुळं गुडघ्याची समस्या वाढण्याचा धोका अधिक असतो. गुडघेदुखी पुढील कारणांनी देखील होतेः

• संधिशोथ

• गुडघ्यावर वारंवार दाब पडल्यामुळं होणारा दाह (जसे बराचवेळ गुडघ्यावर वाकणे, अतिवापर, किंवा जखम).

• जिन्यावरुन वर-खाली जाण्यामुळं गुडघ्यातील वेदना आणखी तीव्र होत जाणे

• फाटलेली कूर्चा किंवा संधिबंध

• ताण किंवा खेचले जाणे

• गुडघ्याची वाटी सरकणे

• संधिमधे दाह होणे

• गुडघ्याला जखम होणे

• कटीतील समस्या – गुडघ्यात जाणवणारी वेदना इथे होऊ शकते.

गुडघेदुखीला कारणीभूत ठरणा-या कारणांमध्ये #अपघात, #लीगामेंटटियर, #मिनिस्कसटियर, #झीज, #अतिलठ्ठपणा , #खाण्यातील_बदल ह्या गोष्ठी कारणीभूत असतात.

 आजाराचे निदान:- 

गुडघेदुखीच्या कारणाचे निदान करण्यासाठी रुग्णांकडून प्रथम दुखण्याविषयी संपूर्ण माहिती घेणे आवश्यक ठरते. रुग्ण धावत असताना कधी व किती ताण गुडघ्यावर पडला, गुडघ्याला मार लागला काय, गुडघ्यामध्ये ताठपणा जाणवतो काय, आपोआप त्रास उत्पन्न झाला की इतर कारणाने त्रास सुरू झाला हे लक्षात घेतले जाते. रुग्णाच्या रक्ताच्या तपासणीद्वारे दुखण्याचे कारण शोधता येते. शिवाय ‘क्ष-किरण’ तपासणीद्वारे रुग्णाचे हाड मोडले असेल किंवा हाडांची झीज झाली असल्यास ते कळते. “X-RAY” तपासणी केल्यानंतरही शंका उरली तर ‘एमआरआय’ तपासणी करता येते. यात हाडांबरोबर लिगामेन्ट, कार्टीलेज, टेंडन यांच्या संबंधित आजार असेल तर तेही कळू शकते.

फिजियोथेरेपी आणि गुडघेदुखी – 

बऱ्याचदा डॉक्टर सांगतात की गुडघ्यानमध्ये झीज झालीये भरून येऊ शकत नाही. पण  नाहीये फिजियोथेरेपी मुळे त्यांची झीज 60% ते 70% पर्यंत भरून काढता येते. यामध्ये अनेक मशीनची सहाय्यता घेतात.आपल्याकडे काही मशीन अशा आहेत ज्यांचा वापर करून शरीरामध्ये येणारे कॅल्शियम हाडांमध्ये  शोषून घेतले जाते. ज्यामुळेहाडांची ताकद वाढते आणि  गुडघेदुखी कमी होण्यास मदत होते. डॉ. अकोलकर यांच्या अथर्व फिजियोथेरेपी क्लिनिक मध्ये जर्मनीची पी.ई.एफ.टी. ही अत्याधुनिक मशीन आहे त्याचबरोबर लेझर एक अत्याधुनिक मशीन आहे यांच्या सहायाने गुडघेदुखी जाऊ शकते तेही कोणतीही शस्त्रक्रिया आणि औषद न घेता. त्याचबरोबर मेट्रिक्स आणि शॉकवेव्ज ही एक उपचार पद्धती आहे. शास्त्रीय व्यायामाच्या सहायाने असा गुडघेदुखीचा त्रास कायमचा बंद करण्यास मदत होते.

आम्ही डॉ. अकोलकर यांच्या अथर्व फिजियोथेरेपी क्लिनिक मध्ये तुम्हाला आमच्या कडील कौशल्याचा  आणि मशिनरीज चा  वापर करून शस्त्रक्रिया मुक्त अशी उपचार पद्धती देऊन पुढील काही काळामध्ये तुम्हाला ह्या असहाय्य वेदनान पासून मुक्त करतो.

 डॉक्टरांची वैशिष्टे- 

• डॉ. रोहन अकोलकर हे स्पोर्ट फिजियोथेरेपी मध्ये पीएच.डी. असणारे  सर्वोत्तम डॉक्टर आहेत. 

• जागतिक स्तरावर प्रसिद्ध असणाऱ्या FIFA WORLD CUP 2018 रशिया  मध्ये सहभाग घेणारे ते एकमेव भारतीय फिजियोथेरेपीस्ट तज्ञ  डॉक्टर आहेत. 

• डॉक्टरांना असणारा प्रचंड अनुभव त्याचबरोबर त्यांचे उच्च शिक्षण.

•  अथर्व फिजियोथेरेपी क्लिनिक मध्ये असणाऱ्या अत्याधुनिक उपकरणे आणि शास्त्रीय  व्यायामाचा वापर करून उपचार केले जातात.

• जर्मन टेक्नोलॉजीच्या मशीन्स उदा. शॉकवेव्ज थेरपी उपचार पद्धती, योग्य परिणामकारक असे उच्च प्रतीचे लेझर उपकरणे ह्या आणि अश्या अनेक   उपकरणांचा उपयोग करून  मणक्यांच्या, पाठीच्या अनेक स्नायू आणि मांसपेशी यांचे दुखणे कायमचे बरे करू शकतो.

 संपर्कासाठी पत्ता- 

  1.  डी. एस. ग्रुप., पहिला मजला, आर्यमान हॉटेल च्या पाठीमागे, लक्ष्मीनगर, फलटण.-ओपीडी वेळ सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 पर्यंत.
  2.  साई बालरुग्णालय, तळ मजला, रिंग रोड (S.T. Stand च्या पाठीमागे) बारामती, ओपीडी वेळ दुपारी 1:00 ते सायंकाळी 5:00 पर्यंत.
  3.  संघवी क्लासिक अ, फ्लॅट नं. 1,  सम्यक लाईफस्टाईल पाठीमागे, भिगवण रोड, बारामती- ओपीडी वेळ सायंकाळी 5:30 ते रात्री 8:30 पर्यंत.
  4. मोबाईल नंबर-7350069955

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!