फिजिओथेरपी ही बिन औषधांची उपचारपद्धती उपयुक्त

आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर; ‘आसरा’ फिजिओथेरपी क्लिनिकचे उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 20 मार्च 2025। फलटण । आजच्या धावपळीच्या युगात कामाचा ताण तणाव आणि बदललेली जीवनशैली यामुळे वेगवेगळे आजार निर्माण होत आहेत. वेगवेगळ्या औषधांचा उपयोग केल्याने शरीरावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे फिजिओथेरपी ही बिनाऔषधांची उपचारपद्धती शरीरासाठी ती खूप प्रभावी आहे. शारीरिक स्वास्थ्य राखण्यासाठी फिजिओथेरपी आणि व्यायाम यांची सांगड घालणारी ही उपचारपद्धती उपयुक्त ठरणारी आहे. तिचा अधिकाधिक लाभ घ्या, असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सभापती, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

येथील एम्पायर टॉवर्स येथे डॉ. सौरभ शिंदे यांच्या ‘आसरा’ या अत्याधुनिक मशिनरी व सर्व सोयी सुविधांनीयुक्त असलेल्या फिजिओथेरपी क्लिनिकचे उद्घाटन आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण, माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन रमणलाल दोशी, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांची प्रमुख उपस्थिती होती.

माजी आमदार दीपक चव्हाण म्हणाले, फिजिओथेरपी ही काळाची गरज बनली आहे. ती आयुष्याच्या सर्व टप्प्यांवर लोकांना दुखापतीतून बरे होण्यासाठी उपयुक्त ठरते. सांध्यांची आणि स्नायूंची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते. डॉ.सौरभ शिंदे यांनी गुजरात व राजस्थान येथे पदवी शिक्षण घेऊन तेथील अत्याधुनिक पध्दतीचा अभ्यास आणि अनुभव घेतला असून त्यात त्यांचा चांगला हातखंडा आहे. त्यांनी अत्याधुनिक इलेक्ट्रिक उपकरणांचा आणि म्यॅनुअल थेरपी यांच्या मदतीने उत्तम सेवा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.त्यामुळे त्यांचे हे क्लिनिक नक्कीच नागरिकांच्या पसंतीस उतरेल.

प्रारंभी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, माजी नगरसेवक अनिकेतराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे स्वागत डॉ.सौरभ शिंदे आणि रामचंद्र शिंदे यांनी केले. गजानन शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. रामचंद्र शिंदे सर यांनी आभार मानले.

यावेळी डॉ. राजवैद्य (गुंगा), डॉ. भोकरे, डॉ. संदीप नाळे, डॉ. अभय कांबळे, डॉ. सौ. माने मॅडम, सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर, मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरच्या चेअरमन सौ. नूतन शिंदे, व्हॉईस चेअरमन श्रीमती निर्मला रणवरे, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमन सौ. उषा मुळीक, सरपंच राहूल तोडकर, सरपंच प्रदीप सावंत, पत्रकार विजय भिसे, अशोक सस्ते,विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, ग्रामस्थ, शिक्षक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!