पुणेचे फुले एज्युकेशन तर्फे तेलंगाणा मध्ये प्रा.सुकुमार पेटकुले सन्मानित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.३१ मार्च २०२२ । पुणे । आदीलाबाद/पुणे- फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या वतीने ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या शतकोत्तर स्मृतिदनानिमित्त आदीलाबाद येथील प्रा.सुकुमार पेटकुले गेली 20 वर्षाहुन अधिक काळ सामाजिक प्रबोधन करीत आहेत म्हणून शाल ,श्रीफळ आणि थोरसमाजसुधारक फुले दाम्पत्य यांचा  एक पुटी पुतळा  संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते देऊन येथोचित गौरव करून त्यांचे  फुले निवासस्थानी दि.21 मार्च 2022 रोजी सकाळी सन्मानित करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय माळी महासंघाचे उपाध्यक्ष माजी न्यायाधीश शिवदास महाजन ,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्त प्रा.सुदाम धाडगे व माळी समाज विकास संस्थेचे अध्यक्ष हनुमंत टिळेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सत्यशोधक ढोक म्हणाले की प्रा. पेटकुले यांनी तेलगू भाषेत  मी महात्मा फुले बोलतोय  संपूर्ण तेलंगाणा  राज्यात लांबलचक प्रवास करून  एकपात्री प्रयोग सादर करून समाजाचे प्रबोधन केलेले आहे.तसेच त्यांनी तेलगू भाषेत महात्मा फुले लिखित तृतीय रत्न नाटक , सार्वजनिक सत्य धर्म आणि इतर  पुस्तके  लिहून मोठे काम करीत अंधश्रद्धा कर्मकांड याला फाटा देण्याचे काम केलेले आहे.आणि ते लवकरच सम्पूर्ण महात्मा फुले समग्र वाङमय देखील तेलगू भाषेत प्रकाशित करणार असून त्याचे काम देखील अतिम टप्यात आलेले आहे. त्यानी हे काम करीत महात्मा फुले यांचे कृतिशील कार्य सत्यशोधक विवाह चळवळ देखील आमचे संस्थेच्या माध्यमातून 2 सत्यशोधक विवाह दुब्बागुडा आणि आसिफाबाद  मध्ये घडविण्यासाठी जे योगदान दिले ते व अनेक ठिकाणी फुले दांपत्य पुतळा उभारण्यात जे बहुमोल सहकार्य केले हे आम्ही प्रत्यक्ष अनेक वेळा अनुभवले आहे.त्याचप्रमाणे ते फहक्त बाहेर प्रबोधन कार्य करीत नसून त्यांनी स्वतः चे मुलाचा सत्यशोधक विवाह चंद्रपूर महाराष्ट्र आणि तेलंगाणा राज्य याचा संगम घडवून आमचे संस्थेच्या वतीने ते सत्यशोधक विवाह 7मे 2022 रोजी मुल या ठिकाणी लावणार आहेत. हे त्यांचे आचार ,विचार आणि कृतिशील कार्य पाहूनच त्यांचे हातून निर्भय सत्यशोधक लवकर घडावेत म्हणूनच फुले दाम्पत्य पुतळा देऊन आम्ही सन्मान  केला असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही असे देखील ढोक म्हणाले.
शिवदास महाजन म्हणाले की अखिल भारतीय माळी महासंघ आणि हुमन राईट्स च्या माध्यमातून देखील त्यांनी मोठे कार्य केलेले आहे.
यावेळी सुदाम धाडगे यांनी सत्याचा अखंड म्हंटला तर हनुमंत टिळेकर यांनी आभार मानले.

Back to top button
Don`t copy text!