फुले एज्युकेशन तर्फे कै.श्रीरंग ढोक यांचा केला सत्यशोधक पदधतीप्रमाणे प्रथम स्मृतिदिन साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ ऑक्टोबर २०२२ । वावरहिरे । फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन च्या वतीने सत्यशोधक समाज स्थापना दीन शताब्दी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कै. श्रीरंग नाना ढोक यांच्या प्रथम स्मृतिदिन महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या सत्यशोधक पदधतीप्रमाणे सत्याचा अखंड व आरती गावून सत्यशोधक रघुनाथ श्रीरंग ढोक यांनी दि.24 ऑक्टोबर 22 रोजी सावतानगर मधील बहुउद्देशीय सत्यशोधक केद्रात विधी पार पाडले.

याप्रसंगी दोन्ही पाय व हात लाईट अपघात मध्ये गमावलेले युवराज वसव यांना ज्येष्ठ समाजसेवक विठ्ठल बनकर व डॉ.राजाराम ढोक यांचे शुभहस्ते व्हीलचेअर आणि त्यांची उत्तम निष्ठेने गेली 6 वर्ष सेवा करणारी त्यांची पत्नी सौ.उषा युवराज वसव यांचा समाजसेविका श्रीमती बायडाबाई ढोक यांचे हस्ते साडी चोळी देऊन सन्मान केला.

यावेळी सत्यशोधक ढोक म्हणाले की अंधश्रद्धा व कर्मकांड यातून सर्व समाजाने बाहेर पडावे यासाठी थोरसमाज सुधारक महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथात जन्मापासून मृत्यू आणि त्या नंतरचे सर्व विधी कसे करावेत हे 150 वर्षा पूर्वी सागून देखील समाज बदलत नाही याची खंत वाटत असल्याचे सागून नाहक आर्थिक उधळपट्टी न करीता आमच्या बहुउद्देशीय केद्रामार्फत मोफत सत्यशोधक विवाह करून तो आर्थिक खर्च वाचवून आपला सुखी संसार करून कर्ज मुक्त व्हावे असे देखील ढोक यांनी सांगितले. तर युवराज वसव म्हणाले की मला प्रथम रघुनाथ ढोक यांनी धीर देत जयपूर पाय देऊन चालविले त्याचा उपयोग नुकतेच मी दहीवडी ते बिदाल मॅरेथॉन 400 मुलांसोबत पार केली त्यामुळे माझे सरवत्र कौतुक केले जात असून विशेष सन्मान खासदार श्रीनिवास पाटील यांनी केल्याने माझे मनोबल वाढल्याचे म्हंटले.

यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास मधुकर ढोक,महात्मा फुले यांच्या पुतळ्यास कीर्तनकार ह.भ. प. होळ महाराज , सावित्रीबाई यांचे पुतळ्यास डॉ.राजाराम ढोक तर डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास बाजीराव वाघ यांनी पुष्पहार अर्पण केला.आणि सत्यशोधक रघुनाथ व सत्यशोधिका आशा ढोक यांनी कै .श्रीरंग व कै.मुक्ताबाई ढोक यांच्या फोटोला पुष्पहार अर्फण केला.या प्रसंगी 150 लोकांना डॉ. प्रल्हाद वडगावकर लिखित महात्मा फुले गीत चरित्र व टर्किश टॉवेल आणि जेवणाचे डबे भेट देण्यात आले.
यावेळी मोलाचे सहकार्य महात्मा फुले प्रतिष्ठान सावतानगर चे सर्व कार्यकर्ते , उद्योजक मा.प्रवीण जैन , हनुंमत कापसे,कोमल ढोपे, आकाश – क्षितिज ढोक व प्रसिद्ध निवेदक यादव यांनी केले.यावेळी परिसरात प्रथमच सत्यशोधक पदधतीप्रमाणे स्मृतिदिन खरी समाजसेवा करीत शपथ घेत साजरी केल्याने चर्चा रंगली होती.या वेळी मोठ्या संख्येने महिला देखील उपस्थित होत्या.


Back to top button
Don`t copy text!