दैनिक स्थैर्य । दि.०८ मार्च २०२२ । बारामती । मोठ्या शहरातील फोटोग्राफी व व्हिडीओ क्षेत्रातील सर्व माहिती, विविध कंपन्यांच्या माध्यमातून वस्तू व सेवा सहज उपलब्ध होण्यासाठी व फोटोग्राफरच्या माध्यमातून ग्राहकांना अद्यावत तंत्रज्ञानचे फोटो, अल्बम व इतर साहित्य सहज उपलब्ध व्हावे म्हणून बारामती तालुक्यातील फोटोग्राफरसाठी बारामती मध्ये फोटो फेअरचे आयोजन करण्यात आलेले होते, अशी माहिती अध्यक्ष मल्लिकार्जुन हिरेमठ यांनी यावेळी दिली.
बारामती तालुका फोटोग्राफर असोसिएशन व शिवम डिजिटल फोटो लॅब यांच्या सयूंक्त विद्यमाने फोटो फेअरचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी ज्येष्ठ फोटोग्राफर गंगाधर काळे, शाम शिंदे, योगेश दुर्गे, मामा गोरे, चाचा इनामदार आणि फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष मल्लिकार्जुन हिरेमठ, शिवम डिजिटल कलर लॅबचे संचालक महेंद्र मांडगे व विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि असोसिएशनचे प्रतिनिधी व बारामती तालुक्यातील सर्व फोटोग्राफर, सोलापूर, अहमदनगर, सातारा व पुणे जिल्ह्यातील फोटोग्राफर संघटना प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटोग्राफी व व्हिडीओ क्षेत्रातील अद्यावत तंत्रज्ञान, कॅमेरे, तज्ञ मान्यवरांची कार्यशाळा, विविध कंपन्याची उत्पादने, लॅब क्षेत्रातील अल्बम, प्रिंटींग, एलएडी फ्रेम आदी माहिती व ऑफर्स आदी सर्व माहिती एकाच छताखाली ग्रामीण फोटो ग्राफर क्षेत्रातील तरुणांना मिळावी वेळ व पैसा वाचवा म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे शिवम डिजिटल कलर लॅबचे संचालक महेंद्र मांडगे यांनी सांगितले.
या वेळी या क्षेत्रातील अद्यावत तंत्रज्ञान बाबत मान्यवरांनी कार्यशाळा मध्ये मार्गदर्शन केले. उत्कृष्ट फोटो सादरीकरण करणाऱ्या व फेअर मध्ये सहभागी होणाऱ्या फोटोग्राफरला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्वागत फोटो ग्राफर असोसिएशनच्या वतीने करण्यात आले. सूत्रसंचालन अनिल सावळे – पाटील यांनी केले तर आभार महेंद्र मांडगे यांनी मानले.