दैनिक स्थैर्य । दि. २५ जुलै २०२२ । फलटण । येथील मुधोजी महाविघालयातील इंग्रजी विभागामधील प्रा.अशोक कृष्णा शिंदे यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर त्यांच्या ‘A Study of Dehumanization of African-Americans with Reference to the Select Autobiographies” या प्रबंधIला पीएचडी पदवी प्रदान केली आहे . विश्वासराव नाईक आर्टस, कॉमर्स व बाबा नाईक सायन्स महाविद्यालय शिराळा चे इंग्लिश विभागप्रमुख डी. वाय. जमादार सर यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले.
यापूर्वी डॉ. शिंदे यांनी एम.ए., बी.ड, सेट,एलएल. एम. इत्यादी पदव्या घेतल्या आहेत. आजपर्यत त्याचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर 12 शोधनिबंध प्रकाशीत झाले आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर , फलटण एज्यूकेशन सोसायटी चे उपाधक्ष्य विश्वासराव देशमुख, प्रशासन अधिकारी प्रा.अरविंद निकम सर , मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य पी.एच. कदम सर, शिवाजी विद्यापीठाचे इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. तृप्ती करेकट्टी , प्रा.डॉ. सरवदे ए.एम, प्रा. डॉ. प्रभाकर पवार शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.