
स्थैर्य, सातारा, दि. 24 नोव्हेंबर : सातारा हे माहेर असलेल्या सौ सायली जाधव गुप्ता या आयआयटी गांधीनगर गुजरात येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनीला आयआयटी गांधीनगर गुजरात विद्यापीठाकडून पीएचडी ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. सौ सायली जाधव गुप्ता हिचा पीएचडीच्या प्रबंधाचा विषय ऊीेश्रिशीं ऊूपराळली ऊीर्ळींशप लू खपींशीषरलळरश्र झहशपेाशपर असा आहे. डॉ उदिप्तो घोष सायलीचे मार्गदर्शक होते. डॉ सायली हिने कर्नाटक राज्यातील सुरतकल येथील एन आय टी मधून बीटेकचे शिक्षण घेतले. एम टेक तिने आयआयटी गांधीनगर गुजरात येथून पूर्ण केले. त्यावेळी तिला सुवर्णपदक मिळाले होते
सौ सायली जाधव – गुप्ता हिने सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून पदवीचे शिक्षण घेतले आहे.
सातारा येथील माजी नगरसेवक व नगरपालिका शिक्षक मंडळ सातारचे माजी सभापती ना.ल. उर्फ अच्युतराव जाधव यांची ती नात आहे. डॉ सायली जाधव – गुप्ता हिचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले व समस्त जाधव परिवाराने अभिनंदन केले आहे.

