दैनिक स्थैर्य | दि. २३ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटणचा आठवडा बाजार हा पूर्वीच्याच ठिकाणी म्हणजे म्हणजे शहरातील महावीर स्तंभ, उमाजी नाईक चौक ते गजानन चौक, उमाजी नाईक चौक ते डेक्कन चौक या ठिकाणी भरणार आहे. आता हा बाजार रविवार, २९ तारखेला पूर्वीप्रमाणेच भरणार आहे. या निर्णयामुळे शेतकरी, व्यापारी व ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
याबद्दल फलटण तालुका व्यापारी संघटनेने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांचे जाहीर आभार मानले आहेत.