खंडकरी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी फलटण तालुका खंडकरी शेतकरी संघटनेचा २९ सप्टेंबरला मोर्चा


स्थैर्य, फलटण, दि. २६ सप्टेंबर : फलटण तालुक्यातील १९८२ ते २०१२ या ३० वर्षांच्या कालावधीतील खंडकरी शेतकऱ्यांना अद्याप शेतीमहामंडळ आणि महसूल खात्याकडून त्यांचे हक्क मिळालेले नाहीत, या मागणीसाठी फलटण तालुका खंडकरी शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा सोमवार, दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता काढण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य खंडकरी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा लक्ष्मी नगर पास, खामगाव येथून सुरू होणार आहे. ज्या खंडकरी शेतकऱ्यांना मागील ३० वर्षांपासून त्यांचे हक्क मिळालेले नाहीत, त्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.

मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले अर्ज सोबत आणावेत. अर्जांचे नमुने साखरवाडी येथील शेतकऱ्यांकडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आपल्या हक्कांसाठी सर्व खंडकरी शेतकऱ्यांनी या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या कार्यकारी सदस्यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!