
स्थैर्य, फलटण, दि. १७ सप्टेंबर : फलटण इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा आणि फलटण तालुक्यातील एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून ओळखले जाणारे, श्री. अरविंद उर्फ तात्यासाहेब जोशी यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या रुबाबदार आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्वामुळे ते केवळ उद्योगविश्वातच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही सर्वपरिचित होते.
श्री. जोशी यांनी आपल्या दूरदृष्टीने आणि परिश्रमातून ‘फलटण इंडस्ट्रीज’ची उभारणी करून तालुक्याच्या औद्योगिक विकासात मोलाचे योगदान दिले होते. एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती आणि त्यांच्यामुळे अनेक स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली होती.
त्यांच्या निधनाने फलटणच्या औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रातील एक मोठे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून उद्योगविश्वावर शोककळा पसरली आहे.