दैनिक स्थैर्य | दि. 20 डिसेंबर 2023 | फलटण | इस्लामपूर येथील राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या यजमान कोल्हापूर विभागाला म्हणजेच फलटण येथील मुधोजी हायस्कुलला व ज्युनिअर कॉलेजला विजेतेपद मिळाले आहे. तर पुणे विभागाला म्हणजेच बारामती येथील अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. राज्यस्तर शालेय हॉकी स्पर्धांमध्ये उत्कृष्ट खेळ करत महाराष्ट्राच्या १४ वर्षाखालील राष्ट्रीय संघामध्ये मुधोजी हायस्कूलच्या कु. गायत्री खरात, वेदिका वाघमोरे, सिद्धी केंजळे व मानसी पवार यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली, प्रकाश पब्लिक स्कूल, निशिकांतदादा स्पोर्टस् फाऊंडेशन व सांगली हॉकी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दिनांक १७ डिसेंबर २०२३ रोजी इस्लामपूरये थील पोलिस परेड मैदानावर या स्पर्धेचा अंतिम सामना संपन्न झाला.
१४ वर्षाखालील मुलींच्या गटात कोल्हापूर विभागातील मुधोजी हायस्कूल व ज्यु.कॉलेज, फलटण या संघाने अंतिम सामन्यामध्ये पुणे विभागावर ३-१ गोल फरकाने एकतर्फी विजय मिळवून विजेतेपद पटकावले.या लढतीत पुणे विभागातील अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल बारामतीने द्वितीय, तर छत्रपती संभाजीनगर विभागातील युरेका इन्फोसेस स्कूल छत्रपती संभाजीनगरने तृतीय क्रमांक पटकावला.
मुधोजी हायस्कूल ची वेदिका वाघमोरे (कोल्हापूर विभाग) हीला मुलींमधे उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. विजेत्या कोल्हापूर विभाग संघास मुधोजी हायस्कूल ज्युनिअर कॉलेज चे क्रीडा मार्गदर्शक एन आय एस कोच सचिन धुमाळ टिम मॅनेजर बंडू खुरेंगे , जेष्ठ मागदर्शक महेश खुटाळे ,क्रीडा मार्गदर्शक शिक्षिका धनश्री क्षिरसागर व वरिष्ठ खेळाडू यांचे मोलाचे मार्गदर्शक लाभले .
या स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीवर महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. या संघांचे सराव शिबीर यवतमाळ येथे होणार आहे. तर मध्यप्रदेश (गाझियाबाद) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत हा संघ महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे
मूलींच्या राज्यस्तरीय विजयी हॉकी संघाचे व क्रीडा मार्गदर्शक कोच यांचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. श्री दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर , महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर ,क्रीडा समितीचे चेअरमन मा. शिवाजीराव घोरपडे व क्रीडा समितीचे सर्व सदस्य , प्रशासनाधिकारी अरविंद निकम, प्राचार्य बाबासाहेब गंगवणे, पर्यवेक्षक शिंदे व्ही. जे., जाधव जी.ए., पर्यवेक्षिका सौ. सुनिता माळवदे , ज्युनिअर चे उपप्राचार्य देशमूख ज्ञानदेव , शिरीष वेलणकर फलटणकर हॉकी प्रेमींनी व मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.